24 November 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

विजबील थकबाकी | विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता | महावितरण राबवणार मोहीम

MSEDCL bill, Cut off power supply, arrears customers

मुंबई, १९ जानेवारी: लॉकडाऊन काळात किंवा त्याही आधीपासून तुमचे विजबिल थकले असेल तर जवळच्या महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क करा. विजबील भरा अन्यथा तुमचा विजपूरवठा खंडीत होऊ शकतो. महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आदेशानुसार यापुढे मोहीम राबवून थकबाकी वसूल केली जाणार आहे. जे ग्राहक थकबाकीदार आहेत त्यांचा विद्युतपुरवठा खंडीत केला जाणार आहेत. महावितरणने ही मोहीम अधिक प्रभावी राबवली तर अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो.

प्राप्त माहितीनुसार, राज्यभरात एकूण 63,740 कोटी रुपये इतकी विजबीलाची थकबकी आहे. ही थकबाकी डिसेंबर 2020 अखेरची आहे. ग्राहकांनी आपली थकीत विजबीले लवकरात लवकर भरावीत. वीज बिल वेळेत भरले नाही तर त्यांचा विद्युतपुरवठा खंडीत केला जाईल, असे महावितरणने म्हटले आहे. विजबील थकबाकी असलेले ग्राहक सर्व प्रकारचे आहेत. यात कृषिपंप ग्राहक, वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक स्वरपाच्या ग्राहकांचाही समावेश आहे. कृषिपंप ग्राहकांकडे तब्बल 45,498 कोटी रुपये, वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8458 कोटी रुपेय तर उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना भरमसाठी वीजबिले आली आहेत. याबाबत ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात होती. वीजबिले माफ करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. दरम्यान, आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणाने आदेश जारी केले आहेत. जर तुम्ही वीजबिल भरले नाही तर थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे.वीजबिल थकबाकीची वसुली तातडीनं करण्याचे आदेश महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. सोबतच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

 

News English Summary: If your electricity bill is exhausted during or before the lockdown, contact the nearest MSEDCL office immediately. Pay the electricity bill otherwise your power supply may be interrupted. MSEDCL Bill Recovery will be carried out as per the order given by MSEDCL to all its field offices. Electricity supply will be cut off to customers who are in arrears (Electricity Bill Arrears). If MSEDCL implements this campaign more effectively, many customers may be affected.

News English Title: MSEDCL bill recovery cut off power supply arrears customers news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x