जागतिक नेत्यांनी प्रथम स्वतः लस घेत नागरिकंना हिम्मत दिली | भारतात ५६ इंची उलटे शौर्य...
नवी दिल्ली, २० जानेवारी: केंद्र सरकारने आज अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वयाच्या 50 च्या पुढच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे पन्नाशीच्या पुढील सर्व खासदार आणि आमदारांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. या टप्प्यात स्वत: मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही लस टोचून घेणार आहेत.
सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, जगभरात लस बाबत शंका उपस्थित होऊ लागल्याने अनेक देशातील प्रमुख नेत्यांनी स्वतः लस घेऊन त्यांचा देशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढवल्याचं पाहायला मिळालं. मात्र भारतात हजारो कोविड योद्यांना लस दिल्यावर ५६ इंच नेते शौर्य दाखवणार असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. कारण भीती आणि शंका तर कोविड योध्यांमध्ये देखील पाहायला मिळाली. मात्र स्वदेशी लस वरून आत्मविश्वास देणाऱ्या सर्वोच्य नेत्यांनी ती प्रथम स्वतः घेण्याचं धाडस दाखवलं नाही हे सत्य आहे.
News English Summary: The central government has taken a very big decision today. In the second phase of corona vaccination, Prime Minister Narendra Modi and all Union ministers will be vaccinated. All MLAs and MPs above the age of 50 will also be vaccinated against corona.
News English Title: Prime minister Narendra Modi to get Covid 19 vaccine shot in second stage of vaccination news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News