22 November 2024 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद भोवलं | KDMC मनसेत भूकंप | 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Kalyan Dombivli, MNS officers resigned, MLA Raju Patil

कल्याण, २४ जानेवारी: राज्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेची चांगली ताकद आहे. तसेच याच महानगर पालिकेत मनसेचं कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क देखील जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार राजू पाटील यांची जनमानसात असलेली चांगली प्रतिमा देखील मनसेसाठी जमेची बाजू समजली जाते.

मात्र कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना स्थानिक पातळीवर मनसेत राजकीय भूकंप झाला आहे. त्यामुळे वेळेवर पक्ष नैतृत्वाने हालचाल न केल्यास विरोधक संधीचं सोनं करू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे मनसेत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यासर्व वादाला कारण ठरलं आहे ते माजी नगरसेवक अनंता चंदर गायकवाड यांनी मनसेत पुन्हा प्रवेश देऊन थेट कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद बहाल करण्यात आलं आणि त्यामुळे निष्ठावान पदाधिकारी संतापले आणि त्यानंतर एकत्रित निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी मनसेचे उपशहर अध्यक्ष संजय राठोड यांच्याकडेल आपले राजीनामा सुपूर्द केले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून संजय राठोड यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

माजी नगरसेवक अनंता चंदर गायकवाड यांनी मनसेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाकडून कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. पक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही माजी नगरसेवक मनसेच्या वाटेवर असून त्यांना पुन्हा पक्षातर्फे मोठी जबाबदारी देऊन निष्ठावंताना डावलण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, अशी माहिती प्रसार माध्यमांकडे आली आहे.

 

News English Summary: Municipal elections, which are considered important in the state, are approaching. MNS has good strength in Kalyan-Dombivali Municipal Corporation which is considered important. Also, a good network of MNS workers in this corporation is also on the positive side. It is noteworthy that the good image of Raju Patil, the only MLA of MNS’s Kalyan Grameen, is also considered a credit to MNS.

News English Title: Kalyan Dombivli 320 MNS officers has resigned from MNS Party news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x