21 April 2025 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मोदी यांनीच बालाकोट एअर स्ट्राइकची माहिती अर्णब गोस्वामीला आधीच दिली होती - राहुल गांधी

PM Narendra Modi, Balakot strike information, Arnab Goswami, Rahul Gandhi

तामिळनाडू, २५ जानेवारी: भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे.

या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली याची चर्चा अजून रंगली आहे. दरम्यान तामिळनाडूच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय गंभीर आरोप केला ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ती व्यक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना मिळाली आहे. मात्र राहुल गांधी यांनी या संदर्भात कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाकडूनही या दाव्याबाबत काही उत्तर आलेले नाही.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, बालाकोट एअर स्ट्राइकबाबत केवळ पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि हवाई दल प्रमुख यांना माहिती होती. या लोकांशिवाय अन्य कुणालाही एअर स्ट्राइकच्या आधी याची माहिती नव्हती. आता बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी ही माहिती एका पत्रकाराला कुणी दिली. माहिती असलेल्यांपैकीच कुणीतरी हवाईदलासोबत विश्वासघात केला असावा, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

 

News English Summary: Rahul Gandhi, who is on a tour of Tamil Nadu, has leveled serious allegations against Prime Minister Narendra Modi over Arnab Goswami’s WhatsApp chat. However, Rahul Gandhi has not submitted any evidence in this regard. On the other hand, the Prime Minister’s Office has not responded to this claim.

News English Title: PM Narendra Modi gave Balakot strike information to Arnab Goswami said Rahul Gandhi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या