25 November 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News
x

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा | मुख्यमंत्र्यांची मागणी

CM Uddhav Thackeray, Maharashtra Karnataka, border dispute

मुंबई, २७ जानेवारी: मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्नाटक सीमावाद सोडवला नाही तर हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.

आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो तसं कर्नाटक सरकार करत नाही. हा विषय केवळ तेवढ्यापुरता बोलण्याचा नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो…मराठी लोकांवर अत्याचार करायचा यावर त्याचं दुमत नसतं. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणारच असं एकत्रितपणे लढलो तर हा प्रश्न सुटेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. “जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात आहे तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has demanded that Karnataka should be declared as a Union Territory. Chief Minister Uddhav Thackeray has clarified that if the Mahavikas Aghadi government does not resolve the Karnataka border dispute, no one will be able to resolve the issue.

News English Title: CM Uddhav Thackeray talked on Maharashtra Karnataka border dispute news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x