22 November 2024 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लोकं फेसबुक'वरील राजकीय बातम्यांना कंटाळले | पॉलिटिकल ग्रुप्सची शिफारस बंद होणार

Facebook, No recommend, political groups, CEO Mark Zuckerberg

मुंबई, २८ जानेवारी: फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकवर पॉलिटिकल ग्रुप्सची शिफारस केली जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता. खरंतर, फेसबुकने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीला 11.22 अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर 3.88 डॉलर्सची कमाई केली.

ऑक्टोबरमध्ये, कंपनीने 2020 च्या अमेरिकन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वातावरण तापू नये म्हणून हा निर्णय घेतला होता. तर कंपनी आपल्या न्यूज फीडमध्ये वापरकर्त्यांद्वारे पाहिलेली राजकीय माहिती कमी करण्याचा विचार करत असल्याची माहितीही मार्क यांनी दिली आहे. झुकरबर्ग म्हणाले की, “आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतसा आहे. तो ऐकल्यानंतर असं दिसून आलं की, लोक आता राजकीय बातम्या पाहणं पसंत करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवा बदलण्याचा विचार केला आहे.

दरम्यान, फेसबुकचा डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे. फॅक्टसॅटने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी असे म्हटले आहे की, फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ११.२२ अब्ज डॉलर नफा कमावला, जो मागील वर्षाच्या कालावधीपेक्षा ५३ टक्के जास्त आहे.

या कालावधीत जर आपण कंपनीच्या उत्पन्नाबद्दल पाहिले तर ते २२ टक्क्यांनी वाढून सुमारे २८.०७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय, फेसबुकचा मासिक युजर्स बेस १२ टक्क्यांनी वाढून सुमारे २.८ अब्ज झाला आहे. फेसबुकमध्ये २०२०च्या शेवटपर्यंत ५८, ६०४ कर्मचारी होते.

 

News English Summary: Facebook CEO Mark Zuckerberg has made a big announcement. Mark Zuckerberg has made it clear that political groups will no longer be recommended on Facebook. The company made the decision at the time of the US election. In fact, Facebook made a good profit in the last quarter of 2020. Between October and December, the company earned 11.22 billion, or 8 3.88 per share.

News English Title: Facebook will not recommend political groups said CEO Mark Zuckerberg news updates.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x