22 November 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

जिल्हा नियोजन बैठक | नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये शाब्दिक बाचाबाची

Clashes, MP Narayan Rane, MP Vinayak Raut

रत्नागिरी, २८ जानेवारी: शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. कोकणातील राजकारणाचा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली. (Clashes during meeting between MP Narayan Rane and MP Vinayak Raut)

जिल्हा नियोजन बैठकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. राणे-राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे नंतर जिल्हापरिषद सदस्यांनी सभागृहात राडा घातला. तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून राऊत-राणे या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली.

तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजन म्हापसेकर यांनी बैठकीत भूमिका मांडली. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. नंतर हाच आक्षेप राणे आणि राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वादाचं कारण बणला. हा वाद नंतर टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली.

 

News English Summary: In the district planning meeting, there was a verbal altercation between BJP MP Narayan Rane and Shiv Sena MP Vinayak Raut. Due to a verbal dispute between Rane and Raut, later Zilla Parishad members held a Radha in the House. It is said that there was a dispute between the Raut and Rane leaders over the bursting of the left canal of Tilari Dam. After the dispute came to an end, Guardian Minister Uday Samant had to mediate.

News English Title: Clashes during meeting between MP Narayan Rane and MP Vinayak Raut news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x