22 November 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शेतकऱ्यांना लाल किल्यावर जाऊ दिलं | गृहमंत्र्यांना विचारा यामागे काय कल्पना होती? - राहुल गांधी

Congress, Rahul Gandhi, Modi government, Farmers issue

नवी दिल्ली, २९ जानेवारी: तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर आहेत. प्रजासत्ताक दिवशी आयटीओ, लाल किल्ला आणि नांगलोई या भागात हिंसा झाली. आजही गाजीपूर आणि सिंघु बॉर्डरवर तणावाची स्थिती आहे. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, तीनही कायदे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, तीनही कायदे कशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवतील.

नवीन कृषी कायदे रद्द करा आणि कचऱ्याच्या टोपलीत टाका. आता हा एकच पर्याय उरला आहे. नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहेत. शेतकऱ्यांना होणारी मारहाण ही दुर्दैवी आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना मारहाण करून देश कमकुवत करत आहे. या फायदा देशविरोधी शक्तींना होईल, असा घणाघात राहुल गांधी यांनी केलाय.

प्रजासत्ताक दिनाच्या वेळी झालेल्या या हिंसाचाराबाबत राहुल गांधी म्हणाले की, 50 शेतकऱ्यांना लाल किल्याच्या आत जाऊ दिलं. हे रोखणं गृहमंत्रालयाचं काम नव्हतं. गृह मंत्र्यांना विचारा यामागे काय कल्पना होती? पंतप्रधान पाच व्यावसायिकांसाठी काम करतात. त्यांच्यासाठी नोटाबंदी आणण्यात आली, जीएसटी त्यांच्यासाठी आणि कृषी कायदादेखील त्यांच्यासाठी आणण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मागे हटण्याची गरजनाही. आम्ही त्यांना सहकार्य करू. हे आंदोलन ऐवढ्यात थांबणार नाही, हे शहरांमधून गावांपर्यंत पोहोचेल.

 

News English Summary: Farmers are on the streets against three agricultural laws. Violence erupted in ITO, Red Fort and Nangloi areas on Republic Day. Even today, there is tension on the Ghazipur and Singhu borders. Former Congress president Rahul Gandhi held a press conference on the whole issue. In it, he said, all three laws need to be understood. He made it clear how all three laws would harm farmers.

News English Title: Congress leader Rahul Gandhi criticised Modi government over farmers issue news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x