23 April 2025 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

‘गोली मार भेजे में’ शिवसैनिक कार्यकर्ते रस्त्यावर | हे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे - आ. आशिष शेलार

BJP, Shivsainik, Overtook at gunpoint

मुंबई, ३० जानेवारी: पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांवर भाजपने निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी व्हिडीओ ट्विट करून थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कारवाईबाबत प्रश्न विचारले. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

शेलार म्हणाले, ज्या पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो बघितल्यावर स्पष्ट होतं की, यावेळी राज्याच्या सत्तेत बसलेले युवा मंत्री पब-पार्टी आणि फिल्मी दुनिया याच्यातच वावरत आहेत. कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ अशा पद्धतीने फिल्मी स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत. दुर्दैवाने हे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत असलेलं वर्तन करावं. स्वतःच्या कार्यकर्त्यांना आवरावे . फिल्मी दुनिया, पाणी, पार्टी हे काही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन नाही, अशी टीका शेलार यांनी केली .

यावेळी आशिष शेलार यांनी राज्य सरकारने लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत घेतलेला निर्णय आणि त्याबाबत घातलेल्या अटींवरुनही टीकास्त्र सोडलं. “राज्य सरकारने लोकल ट्रेनच्या बाबतीत जो निर्णय घेतला, तो सर्व विचार करून घेतला असावा अशी आमची अपेक्षा आहे. पण ज्या वेळेला आपण सर्व विचारांती असे म्हणतो तेव्हा तो सर्व समावेश अपेक्षित आहे. आज घेतलेल्या निर्णयामुळे सुविधांपेक्षा गोंधळ जास्त आणि त्या ठिकाणी सोई पेक्षा अडचणी जास्त अशा स्वरूपाचा आहे. प्रवाशांच्या मनात गोंधळ झालेला आहे”, असं शेलार म्हणाले.

 

News English Summary: BJP has started targeting Shiv Sainiks who allegedly overtook at gunpoint. MIM MP Imtiaz Jalil tweeted a video directly asking the Chief Minister and Home Minister about the action. After that, now BJP MLA Ashish Shelar has targeted the Mahavikas Aghadi and especially the Environment Minister Aaditya Thackeray.

News English Title: BJP has started targeting Shiv Sainiks who allegedly overtook at gunpoint news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या