24 November 2024 8:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

देशाच्या ध्वजाचा अपमान करणाऱ्याला अटक करा | पण बंदुकीच्या धाकाखाली चर्चा अशक्य

Farmers leader Rakesh Tikait, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ३१ जानेवारी: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुखी झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी पहिल्यांदाच शेतकरी आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसेवर भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षात पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावर भाष्य केलं. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली.

दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यावर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण देशाचं राष्ट्रध्वजावर प्रेम आहे. ज्यानं देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे. त्याला अटक करा”, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. नव्या कृषी कायद्यांसंदर्भात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात होणार का? याबाबत विचारलं असता टिकैत यांनी बंदुकीच्या धाकाखाली चर्चा होणं शक्य नाही असं म्हटलं आहे.

 

News English Summary: Rakesh Tikait, a prominent leader of the farmers’ movement, has responded to Modi’s statement. “Is the national flag of the country only for the Prime Minister? The whole country loves the national flag. Whoever has insulted the flag of the country, arrest him,” said Rakesh Tikait. Will there be a resumption of discussions between the government and farmers on new agricultural laws? When asked about this, Tikait said that it is not possible to have a discussion under the pressure of a gun.

News English Title: Farmers leader Rakesh Tikait has responded to PM Narendra Modi statement news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x