5 November 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

मद्य विक्रीसाठी सुट मग वीज बिलात सूट का नाही? - चंद्रकांत पाटील

BJP State president Chandrakant Patil, MahaVikas Aghadi govt, Electricity bills

मुंबई, ३१ जानेवारी: राज्यात सध्या वीज बिल वसुलीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने जाहीर केला आहे. यावरून आता भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकासआघआडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारवर या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. (BJP State president Chandrakant Patil criticised MahaVikas Aghadi govt over electricity bills issue)

कोविड-१९ च्या काळात मद्य विक्रीसाठीच्या शुल्कामध्येही ५० टक्के सूट दिली, मग वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला कोणती अडचण निर्माण झाली आहे? जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का? याचं उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून हा निर्णय मागे घ्या!’ असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारने ताज हॉटेलचे जवळपास १० कोटी रुपये माफ केले, मग सामान्य जनतेचे दुप्पट, तिप्पट वीज बिल राज्य सरकारने माफ का केले नाही?, ठाकरे सरकारने आपल्या प्रिय बिल्डरांना प्रीमियमसाठी ५० टक्के सूट दिली, मग गोरगरिबांची ओढाताण करून हलाखीची परिस्थिती असताना त्यांना वीज बिलामध्ये सवलत का दिली नाही? राज्यभरात आपली बिघडलेली छबी सुधारण्यासाठी राज्य सरकारने ६ कोटी रुपये खर्च केले, मग करोनाच्या काळात वाढीव वीज बिलावर सर्वसामान्यांना दिलासा का दिला नाही?” असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला विचारले आहेत.

 

News English Summary: The issue of electricity bill recovery is currently heating up in the state. MSEDCL has announced a decision to cut off power supply if customers do not pay their electricity bills. With this, the Bharatiya Janata Party has now taken an aggressive stance and the government ahead of Mahavikas is being strongly criticised. Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil has also targeted the government over the issue.

News English Title: BJP State president Chandrakant Patil criticised MahaVikas Aghadi govt over electricity bills issue news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x