22 November 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आगामी विधानसभा | प. बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूला घोषणांचे गाजर

West Bengal, Assam, Kerala, Tamil Nadu, Assembly Election

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: Budget 2021 LIVE : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्याची चर्चा आहे.

निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूत 1.03 लाख कोटींचा नॅशनल हायवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यातच इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्यात येणार आहे. केरळमध्ये 65 हजार कोटी रुपयांचे नॅशनल हायवे निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी मुंबई-कन्याकुमारी इकनॉमिक कॉरिडोअरचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आसाममध्ये येत्या तीन वर्षात हायवे आणि इकनॉमिक कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केली.

 

News English Summary: The bumper announcements have been made from the Union Budget in the backdrop of Assembly elections in some states, including West Bengal, Kerala, Assam and Tamil Nadu. The central government has decided to set up economic corridors in all the three states. The announcement was made by the central government to attract voters from all the four states.

News English Title: Bumper announcements have been made from the Union Budget in the backdrop of Assembly elections news updates.

हॅशटॅग्स

#Budget 2021-22(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x