22 November 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालय सुरु - उदय सामंत

College to start, Minister Uday Samant

मुंबई, ०३ फेब्रुवारी: राज्यातील महाविद्यालय सुरू कधी होणार याची उत्सुकता लागली होती. याबाबत काही बैठका देखील झाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

विद्यार्थी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही याबाबत जी आर काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असेही उदय सामंत यांनी सांगितले. युजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे उदय सामंत म्हणाले.

सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू केले जातील. तसंच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय खुले असतील. महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसेल. मात्र महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना शासनानं घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करावं लागेल, असं उदय सामंत म्हणाले.

 

News English Summary: I was curious when the college in the state would start. Chief Minister Uddhav Thackeray has given permission to start the college. Therefore, the college will start from 15th February. At present, the college will start with a attendance of 50 per cent students, said Higher and Technical Education Minister Uday Samant.

News English Title: College will start from 15th February said Higher and Technical Education Minister Uday Samant news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x