मारिया तुझ्या दूरदृष्टीला सलाम | आम्हाला माफ कर | व्यक्ती म्हणून आम्ही सचिनला ओळखलंच नाही

नवी दिल्ली, ०५ फेब्रुवारी: रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.
२०१४मध्ये मारियानं सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे विधान केलं होतं. विम्बल्डनचा एक सामना पाहण्यासाठी सचिन आणि माजी महान फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम गेले होते. या सामन्यानंतर काही पत्रकारांनी शारापोव्हाला एक प्रश्न विचारला होता. आजचा सामना पाहायला दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आला होता, तू त्याला ओळखतेस का? या प्रश्नावर शारापोव्हाने नाही असे उत्तर दिले होते आणि मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी तिला नको तितकं सुनावलं होतं आणि आता सात वर्षानंतर भारतीयांनी तिची माफी मागितली आहे. केरळात हा ट्रेंड जोरदारपणे सुरु झाला आहे.
सचिन तेंडुलकरनं बुधवारी एक ट्विट केलं. त्यात त्यानं अप्रत्यक्षपणे शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारची बाजू घेतली. त्यानं ट्विट केलं की,”भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा.” तसेच त्यानं आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.
‘आम्हाला माफ कर मारिया… खेळाडू म्हणून सचिनला आम्ही ओळखतो, परंतु व्यक्ती म्हणून ओळखू शकलो नाही. तू बरोबर होतीस आणि तुझ्यावर टीका केल्याबद्दल माफी मागतो. ”ट्रक भरून माफी मागतो, बहीण. तुझी दूरदृष्टी आम्ही ओळखू शकलो नाही आणि आता ती खरी ठरत आहे.”
News English Summary: In 2014, Maria had stated that she did not know Sachin Tendulkar. Tendulkar and former great footballer David Beckham had gone to watch a Wimbledon match. After the match, some journalists asked Sharapova a question. Veteran cricketer Sachin Tendulkar came to watch today’s match, do you know him? To this question, Sharapova answered no, and a great deal of controversy ensued. At that time, Indian fans had told her as much as they wanted and now, seven years later, Indians have apologized to her. In Kerala, this trend has started strongly.
News English Title: Many Kerala peoples are saying sorry to tennis player Maria Sharapova after Sachin Tendulkars tweet news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA