21 November 2024 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कारण ग्रेटाने अदाणींच्या ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीला विरोध केलेला | कोरोनाकाळात मोदी सरकारवर?

Environmentalist Greta Thunberg, Adani group coal mine, Australia, Stop Adani

नवी दिल्ली, ०५ फेब्रुवारी: पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गचे नाव एफआयआरमध्ये नाहीय, असे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी स्पष्ट केले. फक्त ‘टुलकिट’ची निर्मिती करणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने दिल्ली सीमेवर आंदोलन करणार करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताना हे टुलकिट सुद्धा टि्वटरवर शेअर केले होते. पण तिने नंतर टुलकिटचे ते टि्वट डिलिट केले.

ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या टुलकिटमध्ये प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासंबंधीची माहिती होती. तिने नंतर ते टुलकिट कालबाह्य झाल्याचे सांगत ती पोस्ट डिलीट केली व नवीन अपडेटेड टुलकिट शेअर केले. भारतातील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असे तिने पहिले टि्वट केले होते. त्यानंतर काही तासांनी तिने टुलकिट शेअर केले होते. मात्र ग्रेटवर सध्या सत्ताधारी समाज माध्यमांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तिच्या द्वेषाला कारण शेतकरी की अजून काही याची चर्चा सुरु झाली आहे.

ऑस्ट्रेलियात जानेवारी २०२० मध्ये पेटलेल्या वणव्यानं संपूर्ण जगाच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. लाखो लहान मोठ्या प्राण्यांना, सूक्ष्म जीवांना, कीटकांना या आगीत आपला जीव गमवावा लागला होता. त्या आगीवरून भारतातील उद्योगपती गौतम अदानी चर्चेत आले होते. आगीनंतर अदानी उद्योग समूहाच्या ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्याची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही मागणी स्वीडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं केल्यानं संपूर्ण जगाचं अदाणींच्या ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीकडे लक्ष वेधलं गेल होतं.

ग्रेटानं काय आवाहन होतं?

ऑस्ट्रेलियात अदानी उद्योग समूहाचा कारमायकेल कोळसा खाण हा प्रकल्प आहे. अदानी उद्योग समूहाला या कोळसा खाणीत ज्या रेल्वेचा वापर करावा लागतो त्यासाठी सिग्नल टेक्नॉनॉजी देण्याचं काम जर्मनीच्या सिमेन्स कंपनीला देण्यात आलंय. अदानी समूहाच्या वादग्रस्त कोळसा खाण प्रकल्पाविषयी सिमेन्सनं आढावा घ्यावा, असं आवाहन ग्रेटानं केलंय. हे आवाहन करताना तिनं ट्विटरवर #stopadaniअसा हॅशटॅगही सुरू केला होता.

ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरण बचाव मोहिमेचा जगाचा चेहरा बनली होती. तिनं पर्यावणासाठी निसर्गात हस्तक्षेप करणाऱ्यांच्या विरोधात युवा चळवळ सुरू केलीय. ग्रेटानं ट्विट करताना, सिमेन्सपुढं आव्हान उभं केल होतं. सिमेन्स कंपनीनं ठरवलं तर, ते अदानी उद्योग समूहाच्या वादग्रस्त कोळसा खाणीचं काम थांबवू शकतात किमान पुढं ढकलू शकतात, असं ग्रेटानं म्हटलं होतं. तसचं नागरिकांनी कंपनीला योग्य निर्णय घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन ग्रेटानं केलं होतं.

त्यानंतर कोरोना संकटामुळे नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जात होती. केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम होतं. त्याच दरम्यान स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर मोदी सरकारवर टीका केली होती. करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं होतं. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं होतं. यासंदर्भात ग्रेटा थनबर्गने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “भारतातील विद्यार्थ्यांना करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्यची सक्ती करणं अन्यायकारक आहे. जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचं मी समर्थन करते”.

यासर्व पाश्वभूमीवर शेतकरी आंदोलनावर ग्रेटाने भाष्य करताच दिल्लीत तिच्यावर लगेच FIR दाखल केला गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे येथे देखील या पर्यावरणवादी मुलीच्या मागे कायदेशीर अडचणी वाढविण्याचा उद्देशामागे अदानी प्रेम तर नाही ना अशी मोठी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

News English Summary: Environmentalist Greta Thunberg’s name is not in the FIR, Delhi Police said on Thursday. Only FIRs have been registered against the makers of the toolkit, police said. Greta Thunberg, who works for environmental protection, also shared the toolkit on Twitter in support of farmers protesting on the Delhi border. But she later deleted that toolkit tweet.

News English Title: Environmentalist Greta Thunberg voice against Adani group coal mine in Australia news updates.

हॅशटॅग्स

#GautamAdani(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x