23 November 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही - राज ठाकरे

Delhi Farmers Protest, Delhi Police Security, Raj Thackeray

मुंबई, ०६ फेब्रुवारी: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, याच शेतकरी आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं आहे. मोदी सरकारने आणलेलय नव्या कृषी कायद्यांपेक्षा या कायद्यातील तरतुदी चुकीच्या असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. तसेच या कायद्याचा फायदा काही मोजक्या लोकांना होऊ नये असं देखील म्हटलं आहे.

पुढे राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं हे फारच चिघळलं आहे. आम्ही हे सगळं पाहतो आहोत. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत… त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे. सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खातं आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती. चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

यावेळी राज यांनी ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद सुरू झाला त्या रिहानावरही जोरदार टीका केली. केंद्र सरकारने देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींना अशाप्रकारचं ट्विट करायला लावू नये, असं राज ठाकरे म्हणाले. “कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: Raj Thackeray said, “I think it is very chewy. We see it all. Who is behind the farmers? Where does the money come from? The law that the government has brought is not wrong. However, the Center should implement this in consultation with the states. After all, every state has an agriculture department. Every state has different agricultural policies. The decision had to be taken in consultation with the Agriculture Minister or Chief Minister of each state. This case did not need to be so simmered. I have never seen such security on the border with China or Pakistan. There is no need to do so much for the farmers. Their demands should be understood, ”said Raj Thackeray.

News English Title: I have never seen such security on the border with China or Pakistan said Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x