23 November 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

पवार म्हणाले वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा | नंतर कळलं की अदानी पवारांच्या घरी येऊन गेले

Raj Thackeray, Sharad Pawar, Gautam Adani, Electricity Bills

मुंबई, ०६ फेब्रुवारी: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, याच शेतकरी आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं आहे. मोदी सरकारने आणलेलय नव्या कृषी कायद्यांपेक्षा या कायद्यातील तरतुदी चुकीच्या असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. तसेच या कायद्याचा फायदा काही मोजक्या लोकांना होऊ नये असं देखील म्हटलं आहे.

त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे. “वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. लॉकडाउनमध्ये तुम्हाला त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर कसं होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करून. नंतर एकदम घुमजाव झालं,” असं राज ठाकरे म्हणाले.

या मुद्द्यावर राज्यपालांना भेटायला गेलो. राज्यपालांनी शरद पवार यांना बोलायला सांगितलं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा. ते पत्र मला पाठवा. त्यामध्ये अदानी असतील, एमएसईबी असो वा टाटा, मी त्यांच्याशी बोलतो, असं पवार म्हणाले होते. मग पाच सहा दिवसांनी मला असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर सरकारकडं असं आलं की, वीज बिल माफ केलं जाणार नाही,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पवार-अदानी बैठकीबद्दल शंका व्यक्त केली.

यावेळी राज यांनी ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद सुरू झाला त्या रिहानावरही जोरदार टीका केली. केंद्र सरकारने देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींना अशाप्रकारचं ट्विट करायला लावू नये, असं राज ठाकरे म्हणाले. “कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: Went to meet the governor on this issue. The governor asked Sharad Pawar to speak, I spoke to him. They told me to write a letter to the power companies. Send me that letter “I will talk to Adani, MSEB or Tata,” Pawar had said. Then five or six days later I came to know that Adani had come to Sharad Pawar’s house. I don’t know what the discussion was about. But after that, the government came to know that the electricity bill will not be waived, ”said Raj Thackeray, expressing doubts about the Pawar-Adani meeting.

News English Title: Raj Thackeray talked on Sharad Pawar and Gautam Adani meet over electricity bills news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x