23 November 2024 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

सचिनच्या त्या ट्विटनंतर अर्णबने त्याला थेट राष्ट्रविरोधी लेबल लावलं होतं | भाजप नेते शांत होते

Republic TV Arnab Goswami, Anti National, Sachin Tendukar, ICC Cricket World Cup

नवी दिल्ली, ०६ फेब्रुवारी: पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. त्यानंतर, इतरही दिग्गज क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला आहे.

यासंदर्भात ट्विट करताना फडणवीस म्हणाले की, “केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?”.

तसेच याच मुद्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे. आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल. हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे”, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

मात्र भाजपचा दुप्पटीपणा पुन्हा समोर आला आहे आणि विषय देखील आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीतला. CRPF जवानांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर २-३ महिन्यांवर क्रिकेट वर्ल्ड कप जवळ आला होता. त्यावेळी भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध एकही सामना खेळू नये असा सुरु होता. मात्र सचिन तेंडुलकरने यासंदर्भात वेगळी भूमिका घेतली होती, मात्र त्याच्या ट्विट मधील अर्थ पाकिस्तानी टीमला पराभूत करून त्यांची जिरवा. त्याने ट्विट करताना म्हटलं होतं, “वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम नेहमीच पाकिस्तानला वरचढ राहिली आहे…..वेळ आली आहे की त्यांना पुन्हा पराभूत करावं…..त्यांना फुकटचे दोन गुण देऊ नये आणि मालिकेत पुढे जायला मदत करू नये असं मला व्यक्तिगत पातळीवर वाटतं…..मी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करेन जर त्यांनी पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचा निर्णय घेतला….माझ्यासाठी देश सर्वप्रथम आहे….

मात्र त्यानंतर खोट्या राष्ट्रवादाबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या अर्णब गोस्वामी यांनी सचिन तेंडुलकर विरोधात थेट #ShameOnAntiNationals हॅशटॅग चर्चा सत्र आयोजित केलं होतं आणि सचिन तेंडुलकर राष्ट्रविरोधी असल्याचा लेबल लावण्यास सुरुवात केली होती. कारण भारतीय टीमने पाकिस्तानसोबत एकही सामना खेळू नये असं अर्णब गोस्वामींचं मत होतं. मात्र आपल्या मताशी सहमत नसलेल्या प्रत्येकाला अपमानित करून थेट राष्ट्रविरोधी ठरवून LIVE खेळ मांडणं अर्णब गोस्वामी यांचा छंद झाला आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच प्रकाशझोतात आलेल्या TRP घोटाळ्यामध्ये न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये अर्णबकडे देशाच्या लष्करी कारवाईची माहिती देखील पुरवली जात असल्याचं उघड झालं आहे. मात्र त्यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकरला #ShameOnAntiNationals हॅशटॅगने राष्ट्रविरोधी लेबल लावल्याबद्दल ना फडणवीस बोलले, ना चंद्रकांत पाटील ना भाजपचे कोणतेही नेते हे सत्य आहे. मात्र सध्या त्यांना याच विषयावरून केवळ विरोधकांना लक्ष करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांचा बहाणा मिळाल्याचं म्हटलं जातंय.

 

आता मोदी सरकारच्या बाजूने ट्विट करताच अर्णबची पलटी #NationWithSachin कॅम्पेन सुरु

 

News English Summary: Sachin Tendulkar had indirectly responded to pop star singer Rihanna’s tweet through his tweet. Subsequently, other veteran cricketers and celebrities tweeted in support of the government saying India Together. After that, Sachin was trolled on Twitter. In particular, Youth Congress activists in Kerala protested by carrying black oil on Sachin’s poster. Therefore, Leader of Opposition Devendra Fadnavis has questioned the Maharashtra government.

News English Title: Republic TV Arnab Goswami was played a debate Shame on Anti National after Sachin Tendukar tweet on ICC Cricket World Cup match against Pakistan news updates.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x