26 November 2024 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

MSP आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे | त्यामुळे भ्रम पसरवू नका - पंतप्रधान

MSP, Farm Laws, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ०८ फेब्रुवारी: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

फाळणी झाली सर्वात जास्त फटका पंजाबला बसला, जेव्हा दंगली झाल्या पंजाबला भोगावे लागले. जम्मू काश्मीर आणि तेथील घटनांमुळेही पंजाबला त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे, शीख बांधवांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरल्या जात आहेत. गुरुंची महान परंपरा शीख धर्मीयांना आहे. देशाला शीख बांधवांचा अभिमान आहे.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही. एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं.

तसेच एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवं, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया.. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत MSP आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचं आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

 

News English Summary: Let’s see if there is any benefit by making improvements, let’s correct the error. This will modernize the market, increase competition as well as MSP is, will remain and will continue, so do not spread confusion, it is necessary to focus on another option to increase farmers’ income. Consideration should be given to reduce the burden on farmers. You want to do more to increase farmers’ production, to increase profits. Narendra Modi said that farmers should not be pushed into darkness by politics.

News English Title: MSP will remain in future too said PM Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x