22 November 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

आधी बांधकाम अनधिकृत नसल्याचा कांगावा | आता बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी अर्ज

Actress Kangana Ranaut, withdrew petition, High Court, BMC

मुंबई, १० फेब्रुवारी: कंगनाच्या खारमधील राहत्या फ्लॅटवर केलेल्या मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका अखेर कंगनाकडून मागे घेण्यात आली आहे. बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे रितसर अर्ज करणारअसून कंगनाच्या अर्जावर चार आठवड्यांत निकाल देणं बीएमसीला बंधनकारक असणार आहे. जर निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं 3 फेब्रुवारी रोजी खार येथील फ्लॅटचं बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी कंगनाला दिलासा दिला. कंगना रनौतच्या फ्लॅटवर कारवाई करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) दिलेल्या लोअर कोर्टाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला होता. तिच्या फ्लॅटमधील कथित बदल नियमित करण्यासाठी अर्ज दाखल करणार की नाही, याबाबत कोर्टानं कंगनाला 5 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाला कळवण्याचे आदेश दिले होते.

कंगना रानौतने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास त्या अनुषंगाने कार्यवाही दोन आठवड्यांपर्यंत करू नये, असे हायकोर्टाचे आदेश दिले.

 

News English Summary: A petition filed in the Mumbai High Court against the Mumbai Municipal Corporation’s action against Kangana’s flat in Khar has finally been withdrawn by Kangana Ranaut. He will apply to the Mumbai Municipal Corporation to regularise the illegal changes and BMC will be bound to give a decision on Kangana Ranaut’s application within four weeks. The High Court has ordered a two-week adjournment of proceedings if the verdict goes against Kangana Ranaut.

News English Title: Actress Kangana Ranaut withdrew the petition filed in the High Court against the municipality news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x