22 November 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग | रोड रोमिओला ६ महिने कारावासाची शिक्षा

Aurangabad, Road Romeo, 6 months prison

औरंगाबाद, १० फेब्रुवारी: स्त्रियांच्या होणाऱ्या विनयभंगावर न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात एक निर्णय देत एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावे लागते. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात. मात्र औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे अशा पीडित मुलींना बळ मिळणार आहे. पुढे येऊन तक्रार केली तर अशा रोड रोमिओंना कायदेशीर मार्गाने धडा शिकवता येतो, हेच या निकालाने स्पष्ट केले आहे.

तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा सडकछाप रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात. मात्र औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालामुळं अशा पीडित मुलींना बळ मिळणार आहे. पुढे येऊन तक्रार केली तर अशा रोड रोमिओंना कायदेशीर मार्गानं धडा शिकवता येतो, हेच या निकालानं स्पष्ट केलं आहे.

एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला छळत असलेल्याचा आरोप ठेवत साल २०१७मध्ये या आरोपीला अटक करण्यात आली होती. ही मुलगी शाळेत जात असताना हा आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या नजरेत येण्यासाठी सतत तिच्या घरासमोरील बगीच्यात बसून ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसायचा. एकदा ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती. तेव्हा तिथंही या रोड रोमिओनं तिथंही तिची पाठ सोडली नाही. तेव्हा मामानं आपल्या मित्रांनी मदतीनं या रोड रोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

 

News English Summary: The court has given an important verdict on the sexual abuse of women. The Aurangabad Sessions Court has said that it is indecent to look at women alone. A Romeo has been sentenced by a court to six months in prison.

News English Title: Aurangabad Road Romeo has been sentenced by a court to six months in prison news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x