10 January 2025 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH Patel Engineering Share Price | 48 रुपयांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, 55% परतावा मिळेल - NSE: PATELENG EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा
x

ऊर्जा विभाग भरती | SEBC उमेदवारांना EWS प्रवर्गातून भरतीची संधी | ऊर्जा विभागाचं परिपत्रक

State Energy ministry, GR, Recruitment, SEBC EWS

मुंबई, १० फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आता EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसं परिपत्रक ऊर्जा विभागानं काढलं आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळून ही भरती केली जाणार होती. मात्र, त्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केलाय. अखेर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून या भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतला आहे. ऊर्जा विभागातील अभियंता पदासाठी तीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. (State Energy ministry issues GR on recruitment for SEBC candidates to EWS candidates)

महावितरणच्या भरती प्रक्रियेत SEBCच्या उमेदवारांनाही सामावून घ्या,अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार स्थापत्य अभियंता, विद्युत साहाय्यक आणि विद्युत साहाय्यक या पदांच्या भरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येणार होत्या. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यावर या एसईबीसीच्या जागांची भरती केली जाईल, असं महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. ऊर्जा विभागाच्या याच निर्णयावर संभाजीराजे यांनी नितीन राऊत यांना पत्र पाठवत याबाबत खुलासादेखील मागवण्यात आला होता.

 

News English Summary: The way is now clear for the recruitment process in the energy department, which has been stalled over the reservation issue for the past few days. This is because candidates in the SEBC category will now be able to participate in the recruitment process from the EWS category. The circular has been issued by the Department of Energy. The recruitment was to be done excluding the candidates from SEBC category. However, he was strongly opposed by the Maratha community. Finally, the Department of Energy has decided to involve SEBC category candidates in the recruitment process from the EWS category. Three advertisements were published for the post of engineer in the energy department.

News English Title: State Energy ministry issues GR on recruitment for SEBC candidates to EWS candidates news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x