गोल्ड फिंच हॉटेलमध्ये मुंबई भाजप नेते | महाविकास आघाडीसंदर्भातील राजकीय पुड्यांवर चर्चा
मुंबई, १० फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशा राजकीय पुड्या सोडण्याचे प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरु आहेत. मात्र वास्तव वेगळं असल्याने भाजपातील पदाधिकाऱ्यांना पक्षातच थोपवायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र भाजपातील नेत्यांसमोर उभा आहे.
वास्तविक भाजपचं सरकार राज्यात येणं शक्य असलं असतं तर सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं. आणि भाजपाला महाविकास आघाडी सरकार पाडणं इतकं सहज असलं असतं तर आज महाविकास आघाडी सरकारने सत्तेची जवळपास दीड वर्ष पूर्ण केली नसती. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून भाजपच्या आजी-माजी आमदार आणि खासदारांसहित मोठे नेते भाजपाला रामराम ठोकून शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करत आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्याचं प्रमाण अधिकच वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. तसेच राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या १२ विधानपरिषदेच्या आमदारांची वर्णी लागल्यानंतर भाजपाला मोठं गळती लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारख्या तीन तगड्या पक्षांचं सरकार पाडणं शक्य नसल्याने भाजप नेत्यांना असलेले पदाधिकारी टिकवणं कठीण झालं आहे.
यातच काल अंधेरी पूर्वेकडील गोल्ड फिंच हॉटेलमध्ये मुंबई भाजपचे नेते जमले होते. याबैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रभारी आणि राष्ट्रीय महामंत्री सी.टी.रवी, विनोद तावडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे आणि आमदार अमीत साटम तसेच संजय उपाध्याय उपस्थित होते. यावेळी आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच महाविकास आघाडी सरकारबाबत चर्चा झाली. त्यावेळी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांना राज्य सरकार पडणार असल्याचं गाजर देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वेतील या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस नंतर शिवसेना आणि नंतर भाजप असा भूतकाळ असल्याने ते भविष्यात काय निर्णय घेतील ते पाहावं लागणार आहे.
News English Summary: Over the last few days, senior BJP leaders have been trying to release political puppets that would lead to the collapse of the Mahavikas Aghadi government. However, as the reality is different, the question of how to stop the BJP office bearers in the party is facing the Maharashtra BJP leaders.
News English Title: Mumbai BJP leaders meet at Gold Finch hotel in MIDC Andheri East news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार