24 November 2024 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब – गोपीचंद पडळकर

BJP MLA Gopichand Padalkar, Sharad Pawar

जेजुरी, ११ फेब्रुवारी: जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलं असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोना काळ असल्यानं त्याचं उद्घाटन हे रखडलं होतं.

शरद पवार यांच्या सारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय आहे. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा फटाक्यांच्या आतषबाजीत,हालग्यांच्या कडकडाटात, खंडेरायाच्या साक्षीने महाराष्ट्रातील युवा मित्रांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला.

यापूर्वी देखील पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांची तुलना करोनाशी केली होती. “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे,” असं पडळकर यांनी मागील वर्षी जून महिन्यात पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं.

 

News English Summary: This statue should not be inaugurated by a corrupt and racist politician like Sharad Pawar, Ahilya Devi’s work was for Bahujan and everyone else. Gopichand Padalkar has unveiled the statue in a guerrilla poem saying that the statue and our feelings should not be insulted. Hundreds of Bahujan activists from across the state were present at the event. Also, Gopichand Padalkar interacted with the media after the inauguration program, at which time he criticised Sharad Pawar.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar called Sharad Pawar a corrupt and racist politician news updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x