25 November 2024 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

तत्कालीन फडणवीस सरकार | भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप होतो | पण भाजपमध्ये शांतता असते

Chiplun police, BJP leader Madhu Chavan, Rape allegations

मुंबई, १३ फेब्रुवारी: भाजपचे नेते आणि मुंबई म्हाडाचे तत्कालीन अध्यक्ष मधू चव्हाण यांच्या विरोधात सप्टेंबर २०१८ मध्ये चिपळूण पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. चिपळूण येथील ५७ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. त्याचवेळी दिवसांपूर्वी मुंबईतही चव्हाण यांच्यावर असाच गुन्हा दाखल झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील एका शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या या महिलेने यापूर्वीही दोन वेळा मधू चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

२००२ ते २०१७ अशा पंधरा वर्षांच्या कालावधीत चव्हाण यांनी वारंवार लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचा महिलेचा आरोप आहे. मात्र, या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर या महिलेने चिपळूण न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर चिपळूण न्यायालयाने पोलिसांना तक्रारीची तातडीने दखल घेऊन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानेही स्थानिक न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या महिलेने न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानुसार चिपळूण न्यायालयाने मधु चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. या अर्जावर उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढताच हा अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चिपळूण पोलिसांना मधु चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करणे भाग पडले होते. त्यानंतर चिपळूण पोलिसांनी भारतीय दंड 376, 354, 420, 509 अन्वये मधू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर माध्यमांनी विचारल्यावर देखील भाजप नेते शांत होते आणि विशेष म्हणजे मधू चव्हाण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि स्त्रीत्वाचा गैरफायदा घेऊन आपल्याविरुद्ध ही महिला वारंवार खोट्या तक्रारी करत असल्याचे म्हटले होते. या महिलेने आधी केलेल्या तक्रारींचा पोलिसांनी सखोल तपास केला. त्यात काहीच तथ्य आढळलं नाही, असे चव्हाण म्हणाले होते. माझा न्यायालय आणि पोलीस यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे. याबाबत मी माझ्या पक्षालाही पूर्ण कल्पना दिलेली आहे, असेही चव्हाण यांनी माध्यमांकडे स्पष्ट करताना राजीनाम्याचा प्रश्नच येतं नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान सध्याच्या पूजा चव्हाण प्रकरणावर रान उठवणारे भाजपचे कोणतेही नेते प्रतिक्रिया किंवा भूमिका मांडण्यास पुढे आले नव्हते.

 

News English Summary: A case of rape and cheating was registered against BJP leader and then MHADA president Madhu Chavan at the Chiplun police station in September 2018. The complaint was lodged by a 57-year-old woman from Chiplun. At the same time, a similar case was registered against Chavan in Mumbai a few days back. The woman, who works at an educational institution at Margatamhane in Chiplun taluka of Ratnagiri district, had earlier lodged two complaints against Madhu Chavan at the local police station.

News English Title: Chiplun police were lodged two complaints against BJP leader Madhu Chavan after rape allegations news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x