22 November 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये | कायदे रद्द करायला सांगितलंय सत्ता सोडायला नाही

Modi Govt, Rakesh Tikait, Farmers Protest

करनाल, १५ फेब्रुवारी: दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल, अन्यथा शेतकरी घरी जाणार नाही, असा इशारा ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.

करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतला संबोधित करताना राकेश टिकैत बोलत होते. मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असा टोला टिकैत यांनी यावेळी बोलताना लगावला.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून केंद्र सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत, असा निर्धार टिकैत यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारविरोधात ४० नेत्यांनी आम्हांला पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्यामुळे लहान शेतकरी, छोटे व्यापारी आणि ग्रामीण भाग प्रभावित होईल, असा दावा त्यांनी केला.

शेतकरी संघटनांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलेला नाही. आम्ही कधीही चर्चा करायला तयार आहोत. आत्ता केंद्र सरकार शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहे, त्यांच्याविरोधात कारवाई करत आहे. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. केंद्र सरकार चर्चा करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. केंद्र आंदोलकांवर दबाव टाकण्याच्या मागे लागले आहे. असे असेल तर चर्चा कशी होणार? केंद्राने चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे, मग चर्चा होईल असं संघटनांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Tikait has accused the central government of spreading hatred by inciting violence at the Red Fort in Delhi. “Until the agricultural laws are repealed, our demands are not met, the farmers will not sit idly by,” Tikait said. Forty leaders have supported us against the central government. The agriculture law will affect small farmers, small traders and rural areas, he claimed.

News English Title: Tikait has accused the central government of spreading hatred by inciting violence at the Red Fort in Delhi said Rakesh Tikait news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x