27 April 2025 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Special Recipe | नक्की ट्राय करा 'कुल्हडवाली खीर'

Special recipe, Kulhadwali Kheer, Festivals

मुंबई, १५ फेब्रुवारी: पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय मराठी सण उत्सव अपूर्णच नाही का? मात्र तुम्हाला यापेक्षाही काही वेगळं तयार करून पाहायचं असेल तर तुम्ही ‘कुल्हडवाली खीर’ नक्की तयार करुन पाहू शकता. कुल्हड म्हणजेच मातीपासून तयार केलेला पेला. यात ठेवलेल्या खिरीची चवही काहीशी वेगळी आणि स्वादिष्ट असते. चला तर पाहू ‘कुल्हडवाली खीर’ची पाककृती

साहित्य:

  • मातीचे कुल्हड
  • १ लीटर दूध
  • दीड कप तांदूळ
  • ४ टी स्पून सुका मेवा
  • अर्धा चमचा केसर
  • साखर
  • लहान चमचा वेलची पावडर

पाककृती:

  • कुल्हड पाण्यात भिजवून एका बाजूला ठेवून द्या. तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या.
  • एका भांड्यात दूध उकळत ठेवा. दूध उकळू लागलं की त्यात तांदूळ घाला. मंद आचेवर दूधात तांदूळ शिजवून घ्या. त्यात साखरही टाका.
  • हे मिश्रण चमच्यानं चांगलं ढवळून घ्या. त्यानंतर यात ड्राय फ्रूट्स घाला. पाच मिनटं मिश्रण चांगलं परतून घ्या. त्यात केसर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • हे मिश्रण थंड झालं की कुल्हडमध्ये भरा आणि काही वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. ड्राय फ्रूट्स घालून सर्व्ह करा.

 

News English Summary: Isn’t Marathi festival incomplete without Puranpoli and Kata Amti? But if you want to try something different than this, you can definitely try ‘Kulhadwali Kheer’. An ax is a glass made of clay. The taste of Khiri in it is somewhat different and delicious. Let’s see the recipe of ‘Kulhadwali Kheer’.

News English Title: Special recipe of Kulhadwali Kheer for festivals news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Recipe(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या