8 September 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

केरळ | शरद पवारांकडून आमदार मणी सी कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी

NCP President Sharad Pawar, Kerala, MLA Mani C Kappan

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी: केरळातील एलडीफ सरकार आणि केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या महिन्यात केरळचा एक दौरा केला होता. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत जायचे, यावरुन वाद सुरू आहे.

शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर केरळमधील राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीसोबत असलेल्या राष्ट्रवादी पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफमध्ये प्रवेश केला. रविवारी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर कप्पन यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 

News English Summary: Kerala MLA Mani C Kappan has been expelled from the party on the advice of Sharad Pawar. This is said to be a major blow to the Left Front NCP in the run-up to the forthcoming Assembly elections.

News English Title: NCP President Sharad Pawar expels Kerala MLA Mani C Kappan from NCP news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x