19 April 2025 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवर टीव-टीव करणारे अमिताभ, अक्षय गप्प का? - नाना पटोले

Nana Patole, Amitabh bachchan, Akshay Kumar

मुंबई, १८ फेब्रुवारी: देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा अमिताभ, अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून टिवटिव करायचे आणि टीका करायचे. आज ते का शांत आहेत?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, नाना पटोले यांच्या बेधडक इशाऱ्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पटोलेंचं विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. “नाना पटोले हे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानं अशा पद्धतीचं विधान करणं हास्यास्पद आहे. ते आधी २००९ साली काँग्रेस सरकार कसं शेतकरी विरोधी सरकार आहे अशी बोंब ठोकत होते. नाना पटोले ते सारंकाही विसरलेत का?”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

News English Summary: Petrol has now reached hundreds in the country. But still no one is ready to talk about fuel price hike. Why are superstars Amitabh Bachchan and actor Akshay Kumar silent on the issue of fuel price hike during the Congress government? Don’t they see fuel price hike now? This angry question has been asked by Congress state president Nana Patole.

News English Title: Congress state president Nana Patole warn on silence of Amitabh Bachchan and Akshay Kumar news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या