22 November 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडला

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021, celebration, Shivneri Fort

पुणे, १९ फेब्रुवारी: शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित भव्य कार्यक्रम पार पडत आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण तर शिवयोग या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन देखील आज होणार आहे. दरम्यान, शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त पोलिसांनीही सलामी दिली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर ढोल आणि लेझिमच्या पारंपारिक खेळाला सुरुवात झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. शिवनेरीसाठी देण्यात येणारा २३ कोटी ५० लाखांचा निधी पोहोचला असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली. या पैशातून दर्जेदार काम झालं पाहिजे अशी सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केली. हा निधी आणि होणारी कामं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि परिसरातील विकासासाठी आहे याची जाण, भान ठेवून कामं झाली पाहिजेत. काम वेळेत सुरु करुन, वेळेतच पूर्ण झालं आहे. कामचा दर्जा आणि गुणवत्तेत कमरता खपवून घेतली जाणार नाही,” असं अजित पवारांनी यावेळी बजावलं.

 

News English Summary: On the occasion of Shiv Jayanti, a grand function is being held at Shivneri Fort today in the presence of Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar. Meanwhile, the police have also saluted Shivneri on the occasion of Shiv Jayanti.

News English Title: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 celebration on Shivneri Fort news updates.

हॅशटॅग्स

#ChhatrapatiShivajiMaharaj(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x