कपड्यावरून स्तनांना स्पर्श करणं लैंगिक शोषण नाही | त्या निकालवरून महिलेने जजला पाठवले कंडोम
अहमदाबाद, १९ फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्पा व्ही. गनेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीच्या कपड्यावरून तीच्या स्तनांना स्पर्श करणे हे पॉक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण नाही, असा अजब निकाल दिला होता. त्यांच्या या निर्णयावर खूप टीका झाली. न्यायाधिशांच्या या निर्णयावर नाराज होऊन गुजरातच्या देवश्री त्रिवेदी या महिलेने त्यांना १५० कंडोम पाठवले आहेत.
देवश्री यांनी वेग-वेगळ्या बारा ठिकाणी कंडोम पाठवले आहेत. याशिवाय, त्यांनी नागपूर खंडपीठाच्या रजिस्ट्रीतही कंडोम पाठवले आहेत. इंडिया टुडेशी बोलताना देवश्री म्हणाल्या की, त्या अशाप्रकारचा अन्याय सहन करणार नाहीत. न्यायमूर्ती गनेडीवाला यांच्यामुळे एका अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला नाही. देवश्री यांनी न्या.गनेडीवाला यांना पदच्यूत करण्याची मागणी केली आहे.
मागील नऊ फेब्रुवारीला कंडोम पाठवले असल्याचे देवश्री यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘एक महिला म्हणून मी काही चुकीचे केले आहे, असे मला वाटत नाही. मला याचा कसलाच पश्चाताप नाही. स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी झगडायला हवे. न्या. गनेडीवालाच्या या निर्णयामुळे लैंगिक शोषण करणाऱ्या पुरूषांना शिक्षा होणार नाही.
देवश्री यांना आपल्या या वर्तणुकीसाठी शिक्षाही केली जाऊ शकते. नागपूर खंडपीठाच्या रजिस्ट्री ऑफिसने त्यांना कंडोम मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, नागपूर बार असोसियेशनचे ज्येष्ठ वकिल श्रीरंग भांडारकर म्हणाले की, हा मानहानीचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
News English Summary: A few days ago, Justice of the Mumbai High Court. Pushpa V. Ganediwala had given the bizarre conclusion that touching the breasts of a minor girl through her clothes was not sexual abuse under the Pocso Act. His decision was widely criticised. Angered by the judge’s decision, Devashree Trivedi from Gujarat sent him 150 condoms.
News English Title: Gujarat woman send 150 condoms to justice Pushpa Ganediwala to protest controversial Pocso decision news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY