24 November 2024 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

रामचंद्र कह गए सिया से | ऐसा कलयुग आएगा | गाडी खरीदोगे कॅश से | पेट्रोल लोनसे आएगा - अमिताभ

Bollywood superstar Amitab Bachchan, Petrol price, viral on social media, Modi Govt

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

मुंबईत पेट्रोलने ९६.६२ रुपयांची पातळी गाठली. गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ३४ पैसे आणि डिझेलमध्ये ३२ पैसे वाढ केली होती. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८७.६७ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८ रुपये आहे.

दिल्लीत एक लीटर पेट्रोल ९०.१९ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८०.६० रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९२.२९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.६६ रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोल ९१.४२ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.६९ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.२० रुपये असून डिझेल ८५.४१ रुपये झाला आहे.

इंधनाच्या दराने उच्चांक गाठलेला असताना सामान्य माणूस हैराण झाला आहे. महागाई देखील उच्चांक गाठण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र मोदी सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी PR करणारे बॉलिवूड कलाकार सध्या शांत आहेत. त्यातच आता अमिताभ बच्चन यांचं एक जुनं म्हणजे २०१२ मधील ट्विट समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्रॉल करणं सुरु झालं आहे. त्या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे की, “रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदो गे cash से, और petrol loan से आएगा”

 

News English Summary: The common man has been harassed while fuel prices have peaked. Inflation is also projected to reach a record high. But before the Modi government came into existence, Bollywood actors who did PR for them before the Lok Sabha elections are currently quiet. In addition, now a tweet of Amitabh Bachchan is going viral on social media. After that, Amitabh Bachchan has started trolling. In that tweet, Amitabh Bachchan has said, “Ramchandra kaha Gaye Sia Se, Aisa Kalyug aye Ga, Gadi Kharidoge Cash Se, And petrol loan se ayega.”

News English Title: Bollywood superstar Amitab Bachchan old tweet about petrol price gone viral on social media news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x