22 November 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

पेट्रोलचे भाव तब्बल 101.22 | नव्या ऐतिहासिक दराच्या दिशेने वाटचाल सुरु

Petrol priced, Highest rate, India

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी: पेट्रोल आणि डीझेलच्या भावांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलग 12 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. नवीन दरांप्रमाणे आता मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे भाव चक्क 97 रुपयांवर पोहोचले. तर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 90.58 रुपयांनी विकले जात आहे. दिल्लीत आज डीझेलच्या किमती 37 तर पेट्रोलच्या किमती लिटरप्रमाणे 39 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत.

राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोलचे भाव तब्बल 101.22 आणि मध्य प्रदेशातील अनूपनगर येथे 101 रुपये प्रति लिटर भाव झाले आहेत. 4 फेब्रुवारीपासून आतापर्यंत रोज पेट्रोल आणि डीझेलच्या भावात वाढ होत आहे. अर्थात या महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये 14 व्या वेळी वाढ करण्यात आली आहे.

फेब्रुवारीत इंधनाचे दर 14 वेळेस वाढवण्यात आले. या 14 दिवसांत दिल्लीत पेट्रोल 4.03 रुपयांनी तर डीझेल 4.24 रुपयांनी महागले आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात 10 वेळा इंधन महाग झाले होते. गेल्या महिन्यात दिल्लीत पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 2.59 रुपयांनी तर डीझेलच्या किमती 2.61 रुपयांनी वाढवण्यात आल्या. अर्थातच या वर्षाच्या सुरुवातीला 2 महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि पेट्रोल 6.77 रुपये प्रति लिटर आणि डीझेल 7.10 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे.

 

News English Summary: In Ganganagar, Rajasthan, petrol is priced at Rs 101.22 per liter and in Anupnagar in Madhya Pradesh, it is Rs 101 per liter. Petrol and diesel prices have been rising daily since February 4. This is the 14th increase in fuel prices this month.

News English Title: Petrol is priced at Rs 101 per liter with highest rate in India news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x