22 November 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश | हे आहेत फायदे

Benefits of Mint, Daily food, health article

मुंबई, २० फेब्रुवारी: पुदिना हा अत्यंत औषधी म्हणून ओळखला जातो. अनेक लोकांकडून जाणीवपूर्वक पुदिन्याचे सेवन केले जाते. भारतीय स्वयंपाकात पुदिन्याचा वापर जास्त करून चटणीमध्येच केला जातो. पुदिन्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश असणे उपयोगी ठरते.

पुदिन्यामध्ये मेंथॉल, प्रथिने, कर्बोदके, व्हिटॅमिन ए, लोह हे सर्व घटक असतात. पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी थांबविता येऊ शकते. त्याचबरोबर पोटातील गॅसही दूर केला जाऊ शकतो. शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी साठलेला कफ बाहेर काढण्यासाठी पुदिना उपयोगी ठरतो. त्याचबरोबर एखादा विषारी किडा आपल्याला चावल्यास अंगाचा होणारा दाह कमी करण्यासाठी आणि विषाचा परिणाम कमी करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरतो.

पोटाच्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी पुदिना उपयुक्त मानला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण वेगवेगळे जंक फूड खात असतो. त्यामुळे पोट दुखणे, पोटाचे वेगवेगळे विकार होणे हे सामान्य झाले आहे. पण यावर पुदिना हे एक घरगुती स्वरुपाचे औषध मानले जाते. पुदिन्याचा एक चमचा रस एक कप कोमट पाण्यात घालायचा. त्यामध्ये एक चमचा मध घालून घेतल्यास पोटाला आराम पडतो. अनेकवेळा जंक फूड खाल्ल्याने बद्धकोष्ट होते. त्यामुळे पोटात दुखायला लागते. पुदिन्याची पाने उकळून त्यामध्ये मध घालून त्या पाण्याचे सेवन केल्यास पोटाचा आजार बरा होऊ शकतो.

 

News English Summary: Peppermint is known as an extreme medicine. Mint is deliberately consumed by many people. In Indian cuisine, mint is mostly used in chutneys. Mint helps in increasing digestion. Therefore, it is useful to include mint in your daily diet.

News English Title: Benefits of Mint in daily food health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x