मुलीने लग्नाला दिला नकार | म्हणून मुलाने धावत्या रेल्वेतून ढकलण्याचा केला प्रयत्न

मुंबई, २१ फेब्रुवारी: प्रेमात अपयशी ठरलेल्या सुमेध जाधव या मुलाने 21 वर्षाच्या मैत्रिणीला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. पण अयशस्वी झाल्याने तो पळून गेला. परंतु, थोड्या वेळाने रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडले. ही घटना मुंबईतील खार रेल्वे स्टेशनची आहे. स्टेशन प्लॅटफॉर्मवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना टिपण्यात आली आहे.
प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा व मुलगी दोघेही एका कंपनीत काम करत होते. दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते. काही दिवस भेटल्यानंतर मुलाने मुलीशी लग्नाचा प्रस्ताव दिला. दरम्यान, मुलगा दारू पित असल्याचे मुलीला कळाले. त्यानंतर मुलीने स्वत: ला मुलापासून दूर केले आणि लग्नाचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर मुलाने मुलीला त्रास देणे सुरू केले. त्याने मुलीचा पाठलाग सुरू केला. याप्रकरणी मुलीच्या कुटूंबाच्या वतीने निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. हा खटला दाखल झाल्यानंतर काही दिवस तो शांत होता. पण त्याने पुन्हा एकदा मुलीला त्रास देणे सुरू केले.
वांद्रे जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले की, मुलगी शुक्रवारी खार रेल्वे स्थानकात पोहोचली. यावेळी आरोपी सुमेध जाधवही तेथे पोहोचला. त्याने आधी स्वत: ट्रेनच्या पुढे उडी मारण्याचे नाटक केले आणि नंतर त्या मुलीला धावत्या ट्रेनच्या खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे पोलिसच्या जवानांनी मुलीची सुटका केली. तिच्या डोक्यावर 12 टाके पडले. दुसरीकडे, गुन्हा घडवून आणल्यानंतर सुमेध घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपी सुमेध यादव याला अटक केली.
News English Summary: Sumedh Jadhav, who failed in love, tried to push his 21-year-old girlfriend down from the running train. But failing that, he ran away. But, after a while, the railway police caught the accused. The incident took place at Khar railway station in Mumbai. The whole incident was recorded on a CCTV camera mounted on the station platform.
News English Title: Failed in love tried to push his 21 year-old girlfriend down from the running train news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB