22 November 2024 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Special Recipe | शिंगाड्याच्या पीठाचा हलवा

Special recipe, fasting food, Shingada flour halwas

मुंबई, २१ फेब्रुवारी: अनेकजण उपवास असल्यावर केवळ फलाहार घेतात. उपवासात शेंगदाणे, साबुदाणे, बटाटेही अनेकजण खातात. यावेळी शिंगाड्याच्या पीठालाही खूप मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यातलाच एक उपवासाचा पदार्थ म्हणजे शिंगाड्याच्या पीठाचा हलवा होय. तो कसा तयार करायचा हे जाणून घेऊ.

साहित्य:
१ वाटी शिंगाड्याचं पीठ
१ वाटी साखर
१ वाटी तूप
३ वाट्या पाणी
वेलची पावडर
सुका मेवा

कृती:

  • एका तव्यात थोडं तूप गरम करून त्यात सुका मेवा परतून घ्यावा.
  • सुका मेवा बाजूला काढून ठेवावा
  • या तूपात थोडं आणखी तूप वाढवून शिंगाड्यात पीठ परतून घ्यावं.
  • मंद आचेवर शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजून घ्या.
  • एका भांड्यात ३ वाट्या पाणी उकळत ठेवावं, यात साखर टाकून पाक तयार करून घ्यावा.
  • शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजलं की त्यात साखरेचा पाक घालावा. मध्यम आचेवर दहा मिनिटे हे मिश्रण परतवून घ्यावं. त्यात तूपावर परतवलेला सूका मेका टाकावा आणि गरमागरम हा हलवा सर्व्ह करावा.

 

News English Summary: Many people only eat fruit when they are fasting. Many people also eat peanuts, sago and potatoes during fasting. Shingada flour is also in high demand at this time. Many fasting foods are made from Shingada flour. One of the fasting foods is Shingada flour halwa. Let’s learn how to make it.

News English Title: Special recipe fasting food is Shingada flour halwa news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x