22 November 2024 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

पर्यायी व्यवस्थेशिवाय आजपासून प्लास्टिक बंदी लागू, दंड ५००० रुपये

मुंबई : प्लास्टिक बंदी ही निसर्गासाठी चांगली आहे यात काडीमात्र शंका नाही. परंतु सरकारकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता आणि तब्बल ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या देशात मोठं मोठे दंड आकारून एखाद्या गोष्टीवर बंदी आणण्याच्या अनेक योजना अंमलात आणल्या ज्या कालांतराने अपयशी ठरल्या हा इतिहास आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशा विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने प्लास्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही तसेच २० जुलैला अंतिम सुनावणीची तारिख ठरवली जाईल असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आरोप केला आहे कि, मुंबईमध्ये प्लास्टिक हे मोठ्याप्रमाणावर गुजरात राज्यातून येत आणि गुजरातमधील लोकच प्लास्टिकचे व्यापारी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दवाब येण्याची शक्यता होती.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x