25 November 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल | काय आहे मेसेजमध्ये?

Forest Minister Rathod, Pohardevi

यवतमाळ, २२ फेब्रुवारी: पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राठोड गायब असून त्यांचा फोनही लागत नाहीये.

नॉट रीचेबल असलेले वनमंत्री राठोड उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली आहे. त्यानंतर संजय राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय झाले असून “चलो पोहरादेवी चलो पोहरादेवी” ही मोहिम व्हॉट्सअॅपवर राबविण्यात येत आहे.

राठोड समर्थकांकडून व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर मंगळवारी सकाळी ११ वाजता पोहरादेवीत एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबद्दलचे मेसेजही व्हायरल होत आहेत. राठोड यांना पाठिंबा देणं गरजेचे आहे. अन्यथा समाजाचं नुकसान होईल, अशा आशयाचे मेसेज सध्या विविध ग्रुप्सवर व्हायरल करण्यात आले आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राठोड हे इथं संपूर्ण कुटुंबासमवेत येणार असल्याचे समजत आहे. इथं विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील अशीही माहिती मिळत आहे.

 

News English Summary: Forest Minister Rathore, who is not reachable, will visit Pohardevi tomorrow, said the mahant of the temple. After that, Sanjay Rathore’s supporters have started preparing for the reception. In this context, WhatsApp group has become active and the campaign “Chalo Pohardevi Chalo Pohardevi” is being implemented on WhatsApp.

News English Title: Forest Minister Rathod will visit Pohardevi tomorrow news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x