25 November 2024 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मंत्र्यांच्या उपस्थितीत केलेला कोरोनावरील औषधाबाबतचा पतंजलीचा दावा खोटा

World Health Organisation, WHO, Patanjali Corolin, Ayurvedic medicine

नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी: योग गुरु बाबा रामदेव यांनी 19 फेब्रुवारीला कोरोनाचे औषध लॉन्च केले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. यादरम्यान, कोरोनाच्या फर्स्ट एविडेंस बेस्ड मेडिसिनवर सायंटिफिक रिसर्च पेपरदेखील सादर केला होता.

मात्र जागतिक आरोग्य संघटनेने आपण अशा कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेलं नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसेच पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा प्रश्न विचारलाय.

आयएमएने (IMA) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असा अवैज्ञानिक दावा कसा केला जाऊ शकतो असाही सवाल केलाय. तसेच त्यांच्या उपस्थितीत WHO प्रमाणपत्राविषयी सरळसरळ खोटं सांगण्यात आलं. यावर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर द्यावं, अशीही मागणी करण्यात आली.

रामदेव बाबांचा दावा- औषध WHO सर्टिफाइड आहे:
कार्यक्रमात पतंजलिचे को-फाउंडर आणि योग गुरू रामदेव बाबा यांनी दावा केला होता की, ही आयुर्वेदिक औषध WHO सर्टिफाइड आहे. याशिवाय, त्यांनी कोरोनिलला कोरोना उपचारातील चांगले औषध असल्याचाही दावा केला. ते म्हणाले की, या औषधाचे क्लिनिकल ट्रायलदेखील झाले. यानंतर पतंजलि आयुर्वेदचे मॅनेजिंग डायरेक्टर आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, कोरोनिलसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मास्युटिकल प्रोडक्ट सर्टिफिकेट (CPP) दिले आहे. WHO कोणत्याच औषधाला परवानगी देऊ किंवा नाकारू शकत नाही.

 

News English Summary: The World Health Organization (WHO) has stated that it has not tested or certified any such traditional / ayurvedic medicine. Apart from this, the Indian Medical Association (IMA) also objected to Ramdev Baba’s claim. Also, if Patanjali’s medicine protects against corona, then why the cost of Rs 35,000 crore on corona vaccination.

News English Title: World Health Organisation has not tested or certified Patanjali Corolin Ayurvedic medicine news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x