19 April 2025 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

मुंबईत लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना वाढतोय | BMC'चा दावा

Wedding function, Chembur, Social distancing, Corona Virus

मुंबई, २३ फेब्रुवारी: राज्यासह मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता धडक मोहिम सुरु केली असून यात कोरोनाचे नियम मोडणा-यांवर कडक कारवाई केली जात आहे. यात आतापर्यंत केलेल्ये सर्वेनुसार, मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान हॉटेल्स, बार, पब्ज, हॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेचे छापे टाकण्याचे काम सुरु आहे. यात कोरोना नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.

मुंबईकरांनी कोरोना नियमांची काटेकोर अमंलबजावणी केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यापेक्षा लोकांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

दरम्यान, चेंबूर येथे एका विवाह सोहळ्यात 200 हून अधिक लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. विवाह समारोहात एसओपीचे उल्लंघन केल्याबद्दल छेड़ानगर जिमखाना व वधू-वरच्या पालकांविरोधात IPC च्या 188, 269 आणि 34 अंतर्गत टिळक नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. चेंबूरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील कोविड प्रकरणात अचानक झालेल्या वाढीमुळे सरकारला लॉकडाउनचे नियम नव्याने लागू करण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्र सरकारने लोकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

 

News English Summary: Over 200 people at a wedding function y’day in Chembur flouted social distancing norms. FIR registered after BMC’s complaint against Chhedanagar Gymkhana & parents of bride & groom under sec 188, 269 & 34 of IPC for violating SOPs of wedding ceremonies said Tilak Nagar Police

News English Title: Over 200 people at a wedding function y’day in Chembur flouted social distancing norms news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या