संजय राठोड यांनी मौन सोडलं | म्हणाले चौकशीतून सत्य समोर येईल...
यवतमाळ, २३ फेब्रुवारी: चौकशीतून सत्य काय ते पुढे येईल. आज मला काहीही बोलायचे नाही. माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरु राहील, असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून गेले प्रदीर्घ काळ नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. तेथे त्यांनी सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीर संवाद साधला.
या वेळी बोलताना संजय राठोड म्हणाले, आमच्या बंजारा समाजातील मुलीसोबत जे घडले ते अत्यंत वाईट आहे. त्या चव्हाण कुटुंबीयांच्या (पूजा चव्हाण कुटुंबीच्या) दु:खात मी सहभागी आहे. आज मला काहीही बोलायचे नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. या चौकसीतूनच जे काही सत्य पुढे यायचे ते येईल, असेही संजय राठोड म्हणाले.
यावेळी संजय राठोड म्हणाले की, ‘पूजा चव्हाण प्रकरणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात असून, हे घाणेरडे राजकारण सुरू आहे. एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका, अशी विनंती संजय राठोड यांनी हातजोडून केली. राठोड पुढे म्हणाले की, ‘पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारे हे राजकारण आहे’, असे राठोड म्हणाले.
News English Summary: An inquiry will reveal the truth. I have nothing to say today. My work will continue as before, said Forest Minister Sanjay Rathod. Sanjay Rathod, who has been unreachable for a long time since he was named in the Pooja Chavan suicide case, arrived at Pohardevi today. There he visited Sewalal Maharaj. After that, Rathod spoke for the first time through the media.
News English Title: An inquiry will reveal the truth I have nothing to say today said minister Sanjay Rathod news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News