25 November 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

कायदे रद्द न केल्यास ४० लाख ट्रॅक्टर घेऊन संसदेला घेराव - राकेश टिकैत

Farmers Protest, leader Rakesh Tikait, march parliament, Farms Laws

नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी: केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले होते. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. आजपर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेसाठी ११ बैठकी झाल्या तरीही कोणता तोडगा निघताना दिसत नाही, हा निषेध चालू ठेवण्यासाठी आम्ही नवीन रणनीती बनवत आहोत असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले नाही, तर आता संसदेला घेराव घातला जाईल. त्यावेळी चार लाख नाही, तर चाळीस लाख ट्रॅक्टर येतील. शेतकऱ्यांनी तयार राहावे. कोणत्याही क्षणी दिल्लीला येण्याचे आवाहन केले जाऊ शकते, असे राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, कृषी क्षेत्राशी संबंधित कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन आणखी तीव्र होत आहे. २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ‘पगडी संभाल दिवस’ आणि ‘दमन विरोधी दिवस’ यांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी शेतकरी बिलाचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘पगडी संभाल दिवस’ साजरा करत आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) २३ फेब्रुवारीला ‘पगडी संभाल दिवस’ आणि २४ फेब्रुवारीला ‘दमन विरोधी दिवस’ साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांविषयी आदर ठेवावा आणि त्यांच्याविरोधात दडपशाहीचे उपाय केले जाऊ नयेत म्हणूनच या दिवसांचे आयोजन केले आहे.

 

News English Summary: If the central government does not repeal the Agriculture Act, then Parliament will now be besieged. At that time, not four lakh, but forty lakh tractors will come. Farmers should be ready. An appeal can be made to come to Delhi at any time, said Rakesh Tikait.

News English Title: Farmers leader Rakesh Tikait said protesting farmers will march towards parliament news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x