नोकरीदार महिलांसाठी खुशखबर | ESIC कडून आजारपणातील लाभाशी संबंधीत नियमात बदल
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी: कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC Scheme) मंगळवारी झालेल्या बैठकीत नोकरी करणार्या महिलांना मोठा दिलासा दिला आहे. बैठकीत महिलांसाठी आजारपणातील लाभ (Sickness Benefit) घेण्याच्या अटींमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. ईएसआयसीच्या या बैठकीत मातृत्व रजेनंतर आवश्यकता भासल्यास आजाराशी संबंधीत सुटी देण्याच्या व्यवस्थेत दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, महिला विमाधारक 20 जानेवारी 2017 च्यानंतर याचा दावा करू शकतात. महिला विमाधारकाला यापूर्वी हा क्लेम मिळवण्यासाठी 78 दिवसापर्यंत काम करणे अनिवार्य होते. मात्र, आता तो कालावधी कमी करण्यात आला आहे. (ESIC relaxes conditions for women to avail sick leave benefit after maternity leave)
अगोदर केले होते हे बदल:
यापूर्वी ईएसआयसीने मातृत्व लाभ 12 आठवड्यावरून वाढवून 26 आठवडे केला होता. अटींमध्ये ही सूट 20 जानेवारी 2017 पासून लागू होईल. त्याच दिवसापासून मातृत्व लाभ वाढवण्याचा निर्णय सुद्धा प्रभावी झाला होता.
हे आहेत नवीन नियम:
काही प्रकरणात महिला मातृत्व लाभ घेतल्यानंतर आजारापणाचा लाभ घेऊ शकत नव्हत्या. त्याचे कारण हे होते की, त्या यासाठी किमान 78 दिवसाच्या योगदानाची अट पूर्ण करू शकत नव्हत्या. आता या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
आणखी हॉस्पीटल केले जातील स्थापन:
यासोबतच ईएसआयसीने आपल्या विमा योजनेंतर्गत हरिद्वारमध्ये 300 बेडचे एक हॉस्पीटल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 50 सुपर स्पेशियलिटी असतील. याशिवाय विशाखापट्टणमच्या शीलानगरमध्ये एक 350 बेडचे हॉस्पीटल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वेगळे 50 बेडची एक सुपर स्पेशियलिटी विंग असेल. याशिवाय बैठकीत सर्व्हिसमध्ये सुधारणा कशी करता येईल, या मुद्द्यावर चर्चा झाली.
अडीच लाख लोकांना मिळेल फायदा:
हे हॉस्पीटल सुमारे अडीच लाख लोकांची आरोग्य गरज पूर्ण करण्यात उपयोगी ठरेल. कोरोना व्हायरस महामारीमुळे काम करण्याच्या अनिवार्य दिवसांची मर्यादा अन्य विमाधारकांसाठी सुद्धा 1 जानेवारी 2021 पासून 30 जून 2021 पर्यंत सवलतीच्या कक्षेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
News English Summary: The Employees State Insurance Corporation (ESIC) has given a big relief to the working women in its meeting held on Tuesday. The meeting also relaxed the terms of Sickness Benefit for women. At the ESIC meeting, it was decided to provide relief in case of sick leave after maternity leave. According to media reports, women insurers can claim this after January 20, 2017. The female insured was previously required to work for up to 78 days to receive the claim. However, now that period has been shortened.
News English Title: ESIC relaxes conditions for women to avail sick leave benefit after maternity leave news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल