26 April 2025 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, पुढे मिळेल मोठा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

नाशिक स्थायी समिती निवडणूक | मनसे किंगमेकरच्या भमिकेत

Nashik Standing Committee, MNS, Kingmaker, Raj Thackeray

नाशिक, २४ फेब्रुवारी: नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्थायी समितीची निवडणूक रंगतदार होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे.

तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाचे 8, शिवसेनेचे 5, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष सामना होणार असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.

तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने हायकोर्टात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या एकाने वाढली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला हायकोर्टाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला, तर शिवसेनेला एका जागेची लॉटरी लागली.

नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र नाशिक रोड प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता. त्याशिवाय फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे भारतीय जनता पक्षाचं संख्याबळही घटलं होतं.

 

News English Summary: All the 16 members of the standing committee will be newly appointed in Nashik Municipal Corporation. The order of the High Court will be implemented by the mayor. The election of the Standing Committee MNS will be in the role of Kingmaker.

News English Title: Nashik Standing Committee election MNS will be in the role of Kingmaker news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या