22 November 2024 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

केंद्राच्या सोशल मीडिया मार्गदर्शन सूचना | 'त्या' नियमामुळे व्हाट्सअँप भारतात बंद होईल?

Dispute, WhatsApp Policy, Central government Guidelines

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी: केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, नियमांचं उल्लंघन करून समाज माध्यमांवर गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत. व्यवसाय करण्यासाठी समाज माध्यमांचं भारतात स्वागत आहे. पण सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्लॅटफॉर्म असावा. द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. दहशतवादी सोशल मीडियाचा वापरही करत आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मंत्र्यांनी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

मात्र समाज माध्यमांसाठीच्या मार्गदर्शन सूचनांपैकी एक महत्वाची सूचना केंद्रानं केली आहे. ती म्हणजे समाज माध्यमांवर एखादा गैरप्रकार घडल्यास त्याची सुरुवात कुणी केली याची माहिती कंपनीला द्यावी लागेल. सरकारची हीच सूचना व्हाट्सअँप’साठी डोकेदुखी ठरणारी आहे.

व्हाट्सअँपने याआधीच आमचं प्लॅटफॉर्म हे ‘एण्ड टू एण्ड इन्स्क्रिप्टेड’ (end to end encryption) असल्यानं मेसेज कुणी केलाय किंवा नेमकं काय संभाषण झालं हे सांगणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. युझर्सच्या वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एण्ड टू एण्ड इन्स्क्रिप्टेड प्रणालीवरच आमचं व्यासपीठ कार्य करतं, असं WhatsApp ने जाहीर केलं होतं.

केंद्र सरकारने याआधीही व्हाट्सअँपकडे व्हायरल आणि फेक मेसेजेसची सुरुवात कुठून होते याची माहिती देण्यासाठीची मागणी केली होती. पण ते शक्य नसल्याचं व्हाट्सअँपनं स्पष्ट केलं होतं. त्यावरुन व्हाट्सअँप आणि केंद्र सरकारमध्ये वादही झाले होते. केंद्र सरकार आता मेसेजसचं उगम स्थान माहित करुन घेण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे.

तर व्हाट्सअँपनं तांत्रिकदृष्ट्या दोन संभाषणांमधली माहिती काढून घेणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे व्हाट्सअँपनं आता केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना पाळण्यास असमर्थता दाखवली तर पुढे काय होणार? भारतात व्हाट्सअँप बंद होणार का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, केंद्राच्या नव्या मार्गदर्शन सूचनांबाबत अद्याप व्हाट्सअँप’कडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

 

News English Summary: WhatsApp has already said that since our platform is ‘end to end encryption’, it is impossible to say who sent the message or what the conversation was about. WhatsApp had announced that our platform works on an end-to-end inscribed system from the point of view of users’ personal security. The central government had earlier asked WhatsApp to provide information on where viral and fake messages originate from. But WhatsApp had made it clear that it was not possible. This led to a dispute between WhatsApp and the central government. The central government is now adamant on finding out the origin of the messages.

News English Title: Dispute between WhatsApp and the central government news updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x