इंधन दर कधी कमी होणार ते मला सांगता येणार नाही | हे धर्मसंकट आहे - अर्थमंत्री
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी: देशात गेल्या दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे. त्यामुळे ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.34 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 88.44 पैसे इतका आहे.
खरंतर, मागच्या काही दिवसांपासून हाच दर स्थिर आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणी सापडलेले असताना आता वाढत्या इंधनाच्या दरामुळे आणखी पैशांची चणचण भासणार आहे. पॉवर पेट्रोल 100.11 पैसे इतकं झालं आहे. पेट्रोल परवडत नाहीये, सरकारने तोडगा काढावा. सुट द्यावी अशी अपेक्षा आता नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विधान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्मला यांनी म्हटलं आहे. अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही संगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं.
यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं. या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं.
दरम्यान, भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेल्याची किंमत 62 डॉलर प्रति बॅलरच्या जवळपास आहे. गेल्या वर्षी डिसेंबर दरम्यान ही किंमत 50 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास होती. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या मागणीची रिकव्हरी आणि ओपेक द्वारे उत्पादनात कपात केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2020 – 2021 पूर्वी 6 महिन्यात कच्च्या तेलाची किंमत 19.44 डॉलर प्रति बॅरल होती. या दरम्यान भारताचं कच्चा तेलाच्या आयातीचं बिल 57 टक्के घसरून वर्षाकाठी 22.5 अब्ज डॉलरवर आलं होतं.
News English Summary: Union Finance Minister Nirmala Sitharaman on Thursday made a statement on fuel price hike. “We can’t say when petrol and diesel prices will come down,” Sitharaman said. Nirmala also said that the increase in petrol and diesel prices was a crisis. Asked when petrol and diesel prices would come down at an event in Ahmedabad, he said, “I can’t say ‘when’ .. it’s a crisis.”
News English Title: Union finance minister Nirmala Sitharaman talked on increasing fuel rates news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार