22 November 2024 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Twitter घोषणा | तुमचे फॉलोअर्स अधिक असतील तर पैसे कमविण्याची संधी

Twitter. Income Source

मुंबई, २६ फेब्रुवारी: एकाबाजूला ऑस्ट्रेलियाच्या संसदेने एक दिवसापूर्वीच एक ऐतिहासिक विधेयक पारित केलं. त्यानुसार ऑस्ट्रेलियात नवीन मीडिया लॉअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सोशल मीडिया कंपन्यांसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिलाच देश ठरलाय.

त्यानंतर इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे (INS) अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी गुगल इंडिया मॅनेजर संजय गुप्ता यांना एक पत्र लिहिलं आहे. वृत्तपत्रांच्या हजारो पत्रकारांद्वारे लिहिलेल्या बातम्यांसाठी गुगलने पैसे द्यायला हवेत असं पत्रात म्हटलं आहे. मात्र आता ट्विटरकडून स्वतःहून एक पुढाकार घेण्यात आला आहे.

जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वापरत असाल आणि तुमचे फॉलोअर्स अधिक असतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर आता इंस्टाग्राम आणि यूट्यूबप्रमाणेच युजर्सला पैसे मिळवण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात कंपनीने आज आपल्या यजुर्संसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

ट्विटरने दोन नवीन फिचरची घोषणा केली आहे. या नवीन फीचरमुळे कंपनी आता युजर्संना कमविण्याची संधीही देणार आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, आता युजर्संना आपल्या फॉलोअर्सला अतिरिक्त कंटेंट दाखवण्याची, ग्रुप आधारित स्पेशनल कंटेंट तयार करण्याची आणि ग्रुपमध्ये सामील होण्याची सुविधा असणार आहे.

आंतरराष्ट्रीय वेबसाइट ‘The Verge’ च्या मते, यामध्ये एक सुपर फॉलो पेमेंट फिचर असेल. ज्यात युजर्स आपल्या फॉलोअर्सला अधिक कंटेंटपर्यंत पोहोचण्यासाठी पैसे घेऊ शकतील. यामध्ये बोनस ट्विट्स, कम्युनिटी ग्रुपपर्यंत पोहोचणे, न्यूजलेटरची सदस्यता यांचा समावेश आहे. ट्विटरने स्क्रीनशॉटद्वारे दाखविले आहे की, ट्विटर युजर्सला दरमहा 4.99 डॉलर कमवू शकतात. ट्विटरला आपल्या युजर्सला त्यांच्या चाहत्यांद्वारे कमाईचे साधन उपलब्ध करुन द्यायचे आहे. मात्र, या सुविधा केव्हा सुरू होतील, याबद्दल काही सांगण्यात आले नाही.

दरम्यान, सध्या युजर्संसाठी डायरेक्ट पेमेंट टूल खूप महत्वाचे आहे. पॅट्रियन देखील खूप यशस्वी झाले आहे. फेसबुकपासून ते यूट्यूब आणि गिट हबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अशी पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आहे. आता ट्विटरही यात आपला भाग घेणार आहे. मात्र, याबद्दल फारसे काही समोर आले नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सबस्क्रिप्शन फीचरमुळे कंपनीच्या रकमेतही वाढ होईल.

ट्विटरने आपल्या नवीन फीचरचे नाव ‘कम्युनिटी’ ठेवले आहे. हे फेसबुक ग्रुपसारखेच असेल. यामध्ये युजर्स त्यांच्या मनानुसार ग्रुप तयार करू शकतात आणि त्यात सामील होऊ शकतील. ट्विटर त्यांना त्यांच्या पसंतीनुसार विषयांवरील अनेक ट्विट दाखवेल.

 

News English Summary: Twitter has announced two new features. With this new feature, the company will now also give users the opportunity to earn. According to the company’s announcement, users will now be able to show their followers additional content, create group-based special content and join the group.

News English Title: Now you may get income from Twitter if followers count more news updates.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x