22 November 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

पूजा नावाच्या सज्ञान मुलीचं खाजगी आयुष्य तुम्ही वेशीवर टांगताय | माजी IPS अधिकाऱ्याचा संताप

Former IPS, Suresh Khopade, BJP leader Chitra Wagh, Pooja Chavan case

मुंबई, २७ फेब्रुवारी: चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून ठाकरे सरकार आणि संजय राठोडांवर गंभीर आरोप केले. आज नाशकात तब्बल 1 तासांची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्नांची सरबत्ती केली. या सगळ्यानंतर माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

चित्रा वाघ ची वाघीण का बनली? पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे.दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. पूजाचा मृत्यू म्हटलं तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आज वर आलेल्या बातम्या व आरोप वरून वाटते. मी ३५ वर्षे पोलिस दलात नोकरी केली. अनुभवी व चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटना स्थळावर तपास केला तर तो खून आहे की अपघात आहे,की आत्महत्या आहे की….. आहे ते आम्ही ९९ टक्के ओळखतो. एखाद्या घटने मध्ये खून असेल तर तो राजकीय दबाव खाली दडपला जातो का? माझे मत असे की मुळीच नाही. कारण पोलिस स्टेशन हे कांहीं एकमेव तपास करण्याची यंत्रणा नव्हे. क्राईम ब्रंच, सि आय डी क्राईम, सीबीआय… तपास घेवू शकतात. त्यात जर आढळले की पो.स्टेशन अधिकाऱ्याने माहिती दडविली तर तो अधिकारी सह आरोपी (co accused) केला जावू शकतो.

हल्ली कोणीही कोणाला वाचवू शकत नाही.त्यामुळे वानवडी पोलिस योग्य तपास करतील अशी खात्री वाटते. या केसमध्ये सत्ताधारी मंत्र्याचे नाव घेतले जाते. अशा केस मध्ये राजकीय दबाव असू शकतो पण त्याच बरोबर पोलिसावर विरोधी पक्ष,मीडिया,सामान्य जनता,सोशल मीडिया,सद्विवेक बुध्दी …याचा दबाव पोलिस यंत्रणेवर असतो.तो भारी ठरतो. तरीही चित्रा वाघ नावाची महिला एवढा आकांड तांडव का करते? त्यांनी तपास पूर्ण व्हायची वाट पाहायल पाहिजे असे वाटते. पूजा केसचा खरा तपास व्हायला पाहिजे हे मान्य दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे पण तिच्या आईवडिलांचा संशय नाही. ती २१ वर्षाची मुलगी. कस जगायचं याचा पूर्ण अधिकार तिला आहे. राज्य घटना तसा तिला पूर्ण अधिकार देते. मग चित्रा वाघना एव्हड आक्रमक व्हायचं कारण काय?

एका पूर्ण सेक्युलर विचाराच्या पक्षातून आरएसएस तत्वज्ञानावर आधारित भाजप मध्ये वाघ बाईंनी उडी घेतली. का घेतली हे त्यांना नसेल पण लोकांना माहीत आहे. दास, शूद्र व स्रीचे ताडण केले पाहिजे. अशी विचार धारा असलेल्या प्राचीन संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यासाठी निर्माण झालेल्या पक्ष्यात चित्राताई सामील झाल्यात. तिथल्या स्रीयाबद्दल चित्रा ताई किती वेळा पो.स्टेशन मध्ये गेल्या? पूजा नावाच्या सज्ञान महिलेचे खाजगी आयुष्य तुम्ही वेशीवर टांगत आहात. पक्ष बदलून तुम्ही केलेले बंड हे केवढे मोठे वैचारिक अधपतन आहे हे ही लक्षात घ्या!

वाघ कधीच पिसाळत नाही. वाघीण पिसळते. जेंव्हा तिच्या पिल्लावर हल्ला होतो तेंव्हा! प्रश्न असा आहे की चित्रा वाघ यांच्या पोटच्या मुलीने पूजा सारखे वर्तन केले असते तर चित्रा वाघ अश्या वागल्या असत्या का? मुळीच नाही! चित्रा वाघ अश्या का वागतात? चित्रा ताई, देवेंद्र नावाच्या भावाला व वहिनींना खुश करण्या साठी तुम्ही मेहनत घेत असाल तर हे जोडपं हिंदुत्वाच्या नावाखाली मनुस्मृती वर आधारित संस्कृती आणण्याचा विचार मांडतात. पण तुमच्या वहिनीच्या कृतीतील संस्कृतीत ते दिसत नाही. त्यावर ही बोला! अशी एकांगी भूमिका घेवून वाघीण बनता येणार नाही!

चित्रा वाघ ची वाघीण का बनली?
पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे.दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे.
पूजाचा मृत्यू…

Posted by Suresh Khopade on Friday, February 26, 2021

 

News English Summary: An agitation was organized in Nashik today under the leadership of Chitra Wagh to demand the resignation of Forest Minister Sanjay Rathore. After this, he held a press conference and made serious allegations against the Thackeray government and Sanjay Rathore over the Pooja Chavan suicide case. He held a one-hour press conference in Nashik today and asked a lot of questions about the government and the police in the Pooja Chavan case. After all this, former IPS officer Suresh Khopde has written a Facebook post questioning the role of Chitra Wagh.

News English Title: Former IPS officer Suresh Khopade slams BJP leader Chitra Wagh over Pooja Chavan case news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x