22 November 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Beauty Tips | नारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार

Coconut facepack, skin Protection, Summer season

मुंबई, ०१ मार्च: कडक उन्हामुळे अनेकांच्या त्वचेवर पुरळ उठतं, घामोळ्या येतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज व काळवंडते. आपण यासाठी विविध उपाय करून पाहतो. याकाळात त्वचेची आतून तसेच बाहेरून काळजी घेणं आवश्यक आहे ती कशी घ्यायची ते पाहू. (Coconut facepack for protection of skin in summer season beauty tips)

नारळ पाणी (Coconut Water) :
कडक उन्हाळ्यात शरीराची होणारी आग क्षमवण्यासाठी नारळपाणी हे खूपच फायदेशीर आहे. नारळपाणी म्हणजे एक रिफ्रेशिंग ड्रिंक्स असंही म्हणता येईल. नारळपाण्यात पोटॅशियम, सोडियम, व्हिटामिन्ससारखे गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाण्याचं सेवन आवर्जून करावं.

नारळ पाण्यापासून फेसपॅक (Coconut Water Facepack) :
नारळ पाण्यात चिमूटभर हळद, एक चमचा चंदन पावडर आणि काही थेंब टी ट्री ऑईल टाकून फेसपॅक करता येतो. हा फेसपॅक चेहऱ्यासाठी उन्हाळ्यात उत्तम आहे.

कोरफड आणि काकडी फेसपॅक (Aloe and Cucumber Facepack) :
अॅसिडिटी आणि गॅसचा होणारा त्रास कोरफडीच्या ज्यूसनं कमी होतो. तर शरीराला थंड ठेवण्यासाठी काकडी मदत करते. आहारात या दोघांचा समावेश करण्याबरोबरच उन्हाळ्यातील त्वचेचा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी काकडी आणि कोरफडीचं उत्तम फेसपॅक होऊ शकतं.

फेसपॅक (Facepack) :
कोरफडीचा गर आणि काकडी किसून एकजीव करावी हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. ४५ मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. यामुळे पुरळ निघून जाते चेहऱ्याची कांती उजळ होते.

टोमॅटो आणि बीट (Tomatoes and Beetroot) :
उन्हाळ्यात तेलकट, जड पदार्थ खाल्ल्यानं शरीरास त्रास होतो. अशावेळी टोमॅटो आणि बीटचं सूप शरीरास फायदेशीर ठरतं. सूप हे पचायला हलकं असतं.

फेसपॅक (Facepack) :
टोमॅटो पेस्टमध्ये बीटाचा सर मिक्स करून फेसपॅक तयार करावा. ३० मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवावा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते पण त्याचप्रमाणे चेहराही उजळतो. बीटामुळे चेहऱ्यावर गुलाबीसर रंगही दिसतो.

पुदीना (Peppermint) :
पुदीना हा अॅसिडीटी कमी करतो. उन्हाळ्यात जेवणात आवर्जून पुदीन्याचाही सहभाग करावा. पुदिन्यामध्ये अ, क व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहेत.

 

News English Summary: The sun causes acne and sweating on the skin of many people. Intense sunlight dulls and darkens the skin. We try different solutions for this. Let’s see how to take care of the skin inside and outside during this time.

News English Title: Coconut facepack for protection of skin in summer season beauty tips news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x