20 April 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Beauty Tips | उन्हाळ्यात अशी ठेवा त्वचा तजेलदार

Summer season, skin protection, beauty tips

मुंबई, 03 मार्च: कडक उन्हाळ्यात त्वचेला प्रचंड घाम, घामामुळे त्वेचवर उठणारे पुरळ यामुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. सतत उन्हात फिरल्यामुळे त्वचा काळवंडते देखील. अनेकजण सौंदर्यप्रसाधनं वापरून त्वचेवर विविध उपय करतात पण यापेक्षा काही घरघुती उपायांनी आपण त्वचेला तजेलदार बनवू शकतो. त्यासाठी आपण जाणून घेऊया खास घरगुती उपाय. (Summer season skin protection beauty tips health article)

दूध (Milk) :
दूध हे उत्तम क्लीन्झर आहे. कच्च्या दूधात चिमुटभर हळद मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावून १५ मिनिटांनी ते धुवून टाकावं यामुळे त्वचा तजेलदार होते.

गुलाब जल (Rose Water) :
चेहरा टवटवीत राखण्यासाठी गुलाब जल हा खूपच चांगला पर्याय आहे. बेसनमध्ये गुलाबजल मिक्स करून हे पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरची डेड स्कीन निघून जाते. त्याचप्रमाणे दिवसातून दोनदा गुलाबजल चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची कांतीही उजळदार आणि मऊ होते.

अॅलोव्हिरा (Aloe Vera) :
उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणारी पुरळ कमी करायची असेन तर अॅलोव्हिरा हा जास्त फायदेशीर आहे. अॅलोव्हिराचा गर हा चेहरावरील अॅलर्जी कमी करतो त्यामुळे पुरळ, अॅलर्जी, उन्हाचे चट्टे यावर अॅलोव्हिरा जास्त फायदेशीर आहे.

टोमॅटो (Tomato) :
टोमॅटोचा किस चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेचा काळवंडलेपणा निघून जातो. आठवड्याभरात याचा फरक दिसून येतो त्यामुळे वरील पर्यायाबरोबरच टोमॅटोही उजळ त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो.

पपई (Papaya) :
पिकलेली पपईही त्वचेचा काळवंडलेपणा दूर करून त्वचा तजेलदार बनवते. पपईचा किस चेहऱ्यावर लावून पंधरा मिनटांनी चेहरा धुतल्यास चेहरा तजेलदार दिसतो.

 

News English Summary: In hot summers, the skin becomes completely dull due to excessive sweating and acne. Constant exposure to the sun also darkens the skin. Many people use various cosmetics on their skin but there are some home remedies that can brighten the skin. Let us know the special home remedies for this.

News English Title: Summer season skin protection beauty tips news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या